Ad will apear here
Next
ऑफिशिअल सिक्रेट्स
आयटी, कम्प्युटर इंजिनीअर झाले, की साहजिक मोठ्या कंपन्या अथवा आयटी कंपन्यांमध्ये काम करण्याचे आकर्षण असते. या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या तरुण पिढीच्या भावविश्वावर प्रतीक पाटील यांनी ‘ऑफिशिअल सिक्रेट्स’ या कादंबरीतून प्रकाश टाकला आहे. इंजिनीअरिंग पूर्ण केल्यानंतर सुजय शिंदेला लगेचच नोकरी मिळते. जय ठाकूरच्या टीममध्ये काम सुरू केल्यानंतर तो हळूहळू कंपनीत रुळतो. मित्रांमधील गॉसिपिंग, ऑफिसमधील प्रेमप्रकरणे यांवर चर्चा, पार्टी, कामामधील स्पर्धा असे जयचे आयुष्य सुरू होते. यात मधूनच तो कॉलेज जीवनातील आठवणींत रमून जात असतो. विशेषतः मनीषाची आठवण मनात कायम असते. ऑफिसमधील अश्विनी पवार ही मुलगी सुजयला अचानक एसटीत भेटते. पुढे दोघेही मैत्री वाढवत नेतात. याचे रूपांतर प्रेमात होऊन दोघे लग्नबंधनात अडकतात. कन्यारत्नाचे आगमन झाल्याने सुजय खूश असतो; पण यादरम्यान कंपनीची माहिती चोरून दुसऱ्याला दिल्याचा आरोप त्याच्यावर होऊन चौकशीचा ससेमिरा त्याच्या मागे लागतो; पण अखेर त्याची यातून सुटका होते आणि नोकरीही वाचते. या कादंबरीतून सामाजिक परिस्थिती, मानवी नाती, स्वभाव यांचे दर्शन होते.

पुस्तक : ऑफिशिअल सिक्रेट्स
लेखक : प्रतीक पाटील
प्रकाशन : वाचनकट्टा प्रॉडक्शन प्रा. लि. 
पृष्ठे : १७६
मूल्य : २२० रुपये

(‘ऑफिशिअल सिक्रेट्स’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZXMBX
 Outstanding1
 Nice Book,
Once You Read This Book, You May Imagine Yourself In This Story.
And You May Got Solution Of The Problems, Which You Faced In Your Corporate Life.3
 Related to present situation and realistic subject with our present context.1
 आयुष्य जगताना सभोवताली घडत असलेल्या गोष्टीची chemistry या पुस्तकातुन अनुभवायला मिळते.. त्या chemistry मधुन आपन काय शिकायच हे सांगनार अप्रतिम अस पुस्तक... 👍🏻👌🏻👌🏻👌🏻1
 Very nice book . Worth reading especially for youngsters.1
 very nice book...writer has mentioned very practical situations in every ones professional life..and shared right solutions to go ahed. i think this book will help u to how to take discions profesionaly while working in corporate world .1
 Excellent book. Every one should read this book as an essential. It tells us about personal & professional life.. infact its good for the students & corporate people.. those are in early stages of life.. where all story is written in specific and excellent format.. In college life, this book will tell you how to think about future and In corporate life..how to work? also how.. when.. where.. colleagues/coworkers can take benefit of your innocence.. and how to deal with that..!!
Thank you Pratik Sir!!1
 Nice book
Motivation
about personal & professional life..
Similar Posts
लढवय्या.. कॉम्रेड पुंजाबाबा गोवर्धने स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्रोत्तर भारतातील पहिले शेतकरी नेते, भातभाव लढ्याचे प्रणेते, इगतपुरीचे लोकनायक आमदार, शेतकरी आणि लोकांच्या हक्कासाठी लढणारा सच्चा आणि लढवय्या नेता, ही कॉम्रेड पुंजाबाबा गोवर्धने यांची खरी ओळख आपल्या ‘लढवय्या.. कॉम्रेड पुंजाबाबा गोवर्धने’ या पुस्तकातून लेखिका सुमनताई गोवर्धने यांनी करून दिली आहे
अमेरिकेतलं बाळंतपण सध्याच्या युगात जग लहान झालंय. विविध क्षेत्रांतील मोठमोठ्या कंपन्यांच्या नोकरीसाठी बहुसंख्य लोक परदेशी प्रयाण करत आहेत. कालांतराने ते कुटुंबासहित तिकडेच राहतात. पुढे परदेशस्थ झालेल्या लेकी-सुनांच्या बाळंतपणासाठी आईलाही तिकडे जावे लागते. या अशा सगळ्या थोड्या किचकट, पण सुखावणाऱ्या अनुभवातून ‘माधुरी गुर्जर’
समग्र अण्णा भाऊ साठे तुकाराम भाऊराव तथा अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित, 'अण्णा भाऊ साठे' (चरित्र, चेतना, चिंतन) हा आचार्य रतनलाल सोनग्रा यांच्या लेखणीतून साकारलेला हिंदी भाषेतील चरित्रग्रंथ होय. अण्णांची विश्वात्मक भूमिका आणि लोकधुरिणत्व या व्यक्तिमत्त्वाच्या पैलूंवर नेमक्या बिरुदावलीतून प्रकाश टाकणारा हा ग्रंथ आहे
इस्राएल आणि देवाचे राज्य जगात सध्या सुरू असलेल्या घडामोडींवरून जग कसे अंताच्या जवळ जात आहे आणि त्यासाठी कारणीभूत असणाऱ्या गोष्टी आपण कशा निरंतर करत आहोत, या सगळ्या गोष्टी आधीच बायबलमध्ये सांकेतिक भाषेत कशा लिहून ठेवल्या आहेत, ते जगासमोर आणण्याचे काम ‘इस्राएल आणि देवाचे राज्य’ या पुस्तकाच्या माध्यमातून रेजी बंकापूर यांनी केले आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language